Indira Gandhi Vidhwa Pension Yojana
आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील विधवा महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य सरकारने विधवा पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत गरीब कुटुंबातील विधवा महिलांना राज्य सरकारकडून दरमहा काही रुपये दिले जातात. ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. यासह राज्य सरकारच्या वृद्धांसाठी, अपंगांसाठी अनेक उदात्त योजना आहेत. विधवा पेन्शन योजना अर्जदाराच्या बँक खात्यात मासिक देय रक्कम थेट जमा करेल. विधवा पेन्शन योजना 2023 चे लाभ महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्व विधवा महिलांना उपलब्ध आहेत.
आज या लेखामध्ये आपण खालील सर्व मुद्दे पाहणार आहोत
- इंदिरा गांधी पेन्शन योजना काय आहे ?
- विधवा पेन्शन योजनेचे उद्देश्य ..
- लाभार्थी पात्रता काय असणार ?
- यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?
- या योजणेचे लाभ कोणते ?
- अर्ज कसा आणि कुठे करायचा ?
Table of Contents
Toggleइंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना म्हणजे नक्की काय ?
सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य (SJSA) विभागाद्वारे विधवा पेन्शन योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत राज्यातील विधवा महिलांना दरमहा ६०० रुपये पेन्शनची रक्कम दिली जाते तसेच एखाद्या महिलेच्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अपत्ये असल्यास त्या कुटुंबाला दरमहा ९०० रुपये पेन्शन मिळेल. विधवा पेन्शन योजना ही तिची मुले 25 वर्षांची होईपर्यंत किंवा त्यांना नोकरी मिळत नाही, यापैकी जे आधी होईल तोपर्यंत दिली जाईल. जर महिलेला फक्त मुली असतील तर, तिची मुलगी 25 वर्षांची होईपर्यंत किंवा तिचे लग्न होईपर्यंत या योजनेचा लाभ घेता येईल. राज्यातील ज्या इच्छुक विधवा महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी या योजनेअंतर्गत अर्ज करावा लागेल. या योजनेंतर्गत राज्यातील विधवा महिलांना शासनाकडून दरमहा मिळणारी रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाईल.
विधवा पेन्शन योजनेचे उद्देश्य :
मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहेच, की पतीच्या मृत्यूनंतर स्त्रीला तिच्या आयुष्यात कोणताच आधार नसतो आणि तिची आर्थिक स्थिती कमकुवत होते त्यामुळे ती तिच्या जीवनातील दैनंदिन गरजा पूर्ण करू शकत नाही. या सर्व समस्या लक्षात घेऊन राज्य सरकारने विधवा पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत, राज्यातील विधवा महिलांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सरकार दरमहा पेन्शनची रक्कम देईल.
विधवा महिलांना स्वावलंबी बनवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
Vidhwa Pension Yojana या योजनेचे लाभ :
- या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील विधवा महिलांना आहे, ज्यांच्याकडे पैशाचा स्रोत नाही.
- या योजनेंतर्गत राज्यातील विधवा महिलांना दरमहा ६०० रुपये पेन्शनची रक्कम दिली जाणार असून, एका कुटुंबात एका महिलेला एकापेक्षा जास्त अपत्ये असल्यास त्या कुटुंबांना ९०० रुपये दिले जाणार आहेत.
- शासनाने विधवा महिलेला दिलेली रक्कम थेट लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात वर्ग केली जाईल.
- ही योजना आर्थिक अडचणीत असलेल्या महाराष्ट्रातील विधवा महिलांसाठी उपलब्ध आहे.
या योजनेसाठी आवश्यक पात्रता :
- अर्जदार ही विधवा महिला आणि भारतातील कायम स्वरूपाची स्थायिक असावी.
- अर्जदार आर्थिक दृष्ट्या दुर्बल असावी. अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु. 21000 पेक्षा जास्त नसावे.
- अर्जदाराचे बँक खाते असणे आवश्यक आहे आणि त्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे.
- या योजनेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदाराचे वय ६५ पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
Vidhwa Pension Yojana या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
- अर्जदाराचे आधार कार्ड
- ओळखपत्र
- रेशन कार्ड
- रहिवासी दाखला
- जन्माचा / वयाचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- सर्वसाधारण जातीचा अर्जदार वगळता इतर सर्व जातींकडे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
- बँक खाते पासबुक आधार ला लिंक असावे.
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साइज फोटो
इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेसाठी अर्ज कसा करायचा :
मित्रांनो, आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण जवळच्या तलाठी / तहसीलदार / जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज करू शकता. किंवा आपण सेतु केंद्रात जावून सुद्धा अर्ज करू शकता.