Namo shetkari sanman yojana नमो शेतकरी सन्मान योजना

        नमस्कार शेतकरी बांधवानो, सर्वांना केंद्र सरकारच्या वतीनं पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत प्रतेकी ६००० रुपये बँकेत जमा होतात. ही योजना २०१९ ला सुरु करण्यात आली होती. तेव्हापासून दरवर्षी केंद्र सरकार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात तीन टप्प्यात प्रत्येकी दोन हजार रुपये अशा प्रमाणात सहा रुपये जमा करते. आता राज्य सरकारच्यावतीनं देखील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळणार आहेत.

         म्हणजेच आता शेतकरी बांधवांना एकूण बारा हजार रुपये मिळणार आहेत. आता शेतकरी बांधवांना प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये मिळणार आहेत .

         नमो शेतकरी महासन्मान योजना महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आली असली तरी या योजनेचा पहिला हफ्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार या संदर्भात शेतकरी बांधवाना उत्सुकता लागलेली होती.परंतु आता ही उत्सुकता संपली आहे महासन्मान योजनेचा पहिला हफ्ता कधी मिळणार आहे या संदर्भातील तारीख आता नक्की झाली आहे.

Table of Contents

या दिवशी जमा होणार बँकेत पहिला हफ्ता.

        दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ या तारखेला शेतकरी बांधवांच्या बँकेत जमा केले जाणार आहेत.    

namo shetakri sanman yojana

        नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या टप्प्यातील निधी वितरित करण्यास राज्य शासनानं मान्यता दिली आहे.

        शिर्डी येथे एक नियोजित कार्यक्रम आयोजित केला आहे या नियोजित कार्यक्रमामध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हफ्त्याचे वितरण केले जाणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ उपस्थित राहणार आहेत.

        केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेप्रमानेच राज्य सरकारच्या वतीने देखील नमो शेतकरी महासन्मान योजने अंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत. त्याप्रमाणे नमो योजनासंबंधी योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी १७२० कोटी रुपयांच्या निधीच्या वितरणास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

नमो शेतकरी योजनेत अधिक शेतकऱ्यांचा समावेश

       महाआयटीने लावलेल्या विलंबामुळे आणि कृषी विभागाने पडताळणीत केलेल्या दिरंगाईमुळे नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हफ्त्याच्या निधीच्या वितरणास विलंब होत होता.

       प्रधानमंत्री किसान योजनेच्या १४ व्या हप्त्या साठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार होते मात्र कृषी विभागाने ऑगस्ट पासून विशेष मोहीम राबवत पुन्हा पडताळणी केली असता ७ लाख ४१ हजार शेतकऱ्यांची भर पडली आहे.

       केंद्र सरकारचा पीएम किसान निधीचा 14 वा हप्ता 85.60 लाख शेतकऱ्यांना मिळाला होता मात्र आता नवीन अभिलेखाची तपासणी केल्यावर राज्यातील पात्र लाभार्थ्याची संख्या 93.07 लाख एवढी झालेली आहे.

      म्हणजे जे शेतकरी बांधव पीएम किसान सन्मान निधीपासून वंचित होते त्यामध्ये अधिकची भर पडलेल्या ७ लाख ४१ हजार शेतकरी बांधवाना देखील आता या योजना अंतर्गत लाभ मिळणार आहे.

लक्षात ठेवा ही तारीख

        शेतकरी बांधवांनो तारीख लक्षात असू द्या येणाऱ्या २६ ऑक्टोबर २०२३ पासून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा पहिला हफ्ता जमा केला जाणार आहे.

Scroll to Top