mahiti pahije

(lek ladki yojana) लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023 | मुलींना शासन देणार आता 1 लाख 1 हजार रुपये! पाहा योजना नक्की काय आहे.

         नमस्कार बांधवानो, सर्वांना आली एक आनंदाची बातमी केंद्र सरकारच्या वतीनं आपल्या लाडक्या लेकीला मिळणार 1 लाख 1 हजार रुपये. (Lek Ladki Yojana) या लेखांमध्ये लेक लाडकी योजनेविषयीची महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

         महाराष्ट्र लेक लाडकी योजना काय आहे, या योजनेचे लाभ, अर्ज कसा करायचा,अर्ज कुठे करायचा, लाभार्थी,पात्रता,आवश्यक कागदपत्रे याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे.

          Maharashtra Lek Ladki Yojana 2023, How To Apply, Eligibility Criteria, Beneficiaries, Required Documents, Official Website, 

          महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली लेक लाडकी योजना ही मुलींसाठी एक महत्वपूर्ण योजना असून या अंतर्गत गरीब व आर्थिक दृष्ट्या मागास कुटुंबातील मुलींना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक लाख एक हजार रुपयांचे आर्थिक मदत दिली जाणार आहे. लेक लाडकी योजना ही महाराष्ट्रातील सर्व गरीब मुलींसाठी खूप फायद्याची व वरदानदायी ठरणार आहे.

           राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2023-24 चा अर्थसंकल्पामध्ये ही योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या अंतर्गत गरीब पात्र मुलींना वयाची 18 वर्षे पूर्ण करेल तेव्हा तिला 75 हजार रुपयांची रोख रक्कम दिली जाणार आहे. “लेक लाडकी” या नावानं ही योजना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केली आहे. फडणवीसांनी घोषणा करताना सांगितलं की, मुलींच्या सक्षमीकरणाकरता लेक लाडकी ही नवी योजना सुरु करण्यात येईल.

        राज्य शासनाच्या या नव्या योजनेचा लाभ पिवळ्या आणि केशरी कार्डधारक कुटुंबातील मुलींना मिळणार आहे. त्यानुसार मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावावर ५००० रुपये जमा केले जातील. त्यानंतर चौथीत असताना ४०००, सहावीत असताना ६००० आणि मुलगी अकरावीत गेल्यानंतर तिच्या खात्यात ८००० रुपये जमा केले जातील. लाभार्थी मुलीचे वय १८ झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख देण्यात येतील.

Lek Ladki Yojana महाराष्ट्र लेक लाडकी योजनेचा लाभ :

लाभ कधी मिळणार

मिळणारी रक्कम

मुलीच्या जन्मावर

5000/-

पहिली वर्गात प्रवेश घेतल्यावर

6000/-

सहाव्या वर्गात प्रवेश घेतल्यावर

7000/-

अकरावीत प्रवेश घेतल्यावर

8000/-

मुलगी 18 वर्षांची झाल्यावर

75000/-

एकूण मिळणारी रक्कम

1,01,000/-

Lek ladki Yojna महाराष्ट्र लेक लाडकी योजनेची उद्दिष्टे :

  • मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देवून मुलींचा जन्मदर वाढविणे
  • मुलींच्या शिक्षणास चालना देणे
  • मुलींचा मृत्यूदर कमी करणे. 
  • बालविवाह कमी करणे

महाराष्ट्र लेक लाडकी योजने साठी आवश्यक कागदपत्रे :

  • लाभार्थी व पालकाचे आधारकार्ड (पहिल्या लाभावेळी मुलीच्या आधारकार्डसाठी सूट)
  • पिवळ्या किंवा केशरी रंगाचे शिधापत्रिका
  • लाभार्थी मुलीचा जन्म दाखला
  • पालकांसह मुलीचा फोटो
  • अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  • पत्त्याचा पुरावा
  • वार्षिक उत्पन्न एक लाख असल्याचा तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला
  • राष्ट्रीयीकृत बँकेतील पासबूकच्या (माता व मुलीचे संयुक्त खाते) पहिल्या पानाची झेरॉक्स, रेशनकार्ड
  • मतदान ओळखपत्र (शेवटच्या लाभावेळी मुलीचे नाव मतदार यादीत बंधनकारक)
  • लाभाच्या प्रत्येक टप्प्यावर मुलगी शाळा शिकत असल्याचा दाखला (बोनाफाईड)
  • माता किंवा पित्याच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र
  • अंतिम लाभासाठी मुलीचा विवाह झालेला नसावा (अविवाहित असल्याचे स्वयंघोषणापत्र बंधनकारक)
  • मोबाईल नंबर
  • जीमेल आयडी

महाराष्ट्र लेक लाडकी योजने साठी पात्रता :

  • लेक लाडकी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी मुलगी ही मूळची महाराष्ट्राची असावी.
  • पिवळ्या किंवा केशरी रंगाचे शिधापत्रिका असलेले कुटुंब लेक लाडकी योजनेसाठी पात्र असतील.
  • १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या एक किंवा दोन मुलींसाठी ही योजना लागू राहील. एक मुलगा व एक मुलगी असल्या मुलीला मिळेल लाभ.
  • पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करताना माता व पित्याने कुटुंब नियोजन केल्याचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक.
  • दुसऱ्या अपत्यानंतर आई किंवा वडील दोघांपैकी एकाने कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणे बंधनकारक राहील.
  • दुसऱ्या प्रसुतीवेळी जुळी अपत्ये जन्माला आली आणि त्यात एक मुलगी किंवा दोन्ही मुली जन्माला आल्या तर दोन्ही मुलींना लाभ मिळेल. पण, त्यावेळी माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे अनिवार्य.
  • १ एप्रिल २०२३ पूर्वी एक मुलगी किंवा एक मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीला किंवा जुळ्या मुलींनाही मिळेल लाभ.
  • तो नागरिक महाराष्ट्रातील गरीब व मागासवर्गीय असावा.
  • लेक लाडकी योजनेसाठी अर्ज करणाऱ्या कुटुंबाचे उत्पन्न एक लाखांपेक्षापेक्षा जास्त नसावे.

महाराष्ट्र लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा?

          महाराष्ट्र शासनाने वार्षिक अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील मुलींसाठी महाराष्ट्र लेक लाडकी योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. मात्र सरकारने अद्याप ही योजना राज्यात लागू केलेली नाही. ही योजना सरकारकडून लवकरच लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची माहितीही सार्वजनिक केली जाणार आहे.तसेच आम्हीसुद्धा अपडेट करू.आणि आमचा whatsapp ग्रुप सुद्धा जॉइन करू शकता.

          

काही महत्वाच्या लिंक्स :

महिला व बाल विकास विभाग

महाराष्ट्र शासन Official Website

लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023 Official Website

Coming Soon 

लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023 Apply Online  

Coming Soon 

FAQ/काही प्रश्न  :

Ques :- लेक लाडकी योजना कोणी आणि कधी सुरू केली ?

Ans :- महाराष्ट्र सरकारने 2023 ला सुरू केली आहे व महाराष्ट्रातील मुलींसाठी ही योजना सुरू केली आहे.

Ques :- लेक लाडकी योजना कोणासाठी आहे?

Ans :- पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी.

Ques :- लेक लाडकी योजना कागदपत्रे कोणती आहेत?
Ans :- हे वरील लेखात आम्ही सांगितले आहे तुम्ही पेज स्क्रोल करून ते वाचू शकता.

Ques :- लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा?
Ans :- महाराष्ट्र सरकारने अद्याप ही योजना राज्यात लागू केलेली नाही. त्यामुळे अर्जप्रक्रिया अद्याप सुरु झालेली नाही. याच पोर्टल आम्ही तुम्हाला माहिती कळवू किंवा आमचा whatsapp ग्रुप जॉइन करा किंवा अधिकृत वेबसाइटला सुद्धा अपडेट होईल.

Leave a Comment

Scroll to Top